स्थापना :-१४ जून १९५८ २०१२ साली डेक्कन कॉर्नर या परिसरातून शाळा कर्वेनगर परिसरात स्थलांतरित झाली. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचा सामाजिक, भावनिक शारीरिक व बौद्धिक विकास करणे विविध कला कौशल्यांचा तसेच जीवनावश्यक कोश्ल्ये विकसित व्हावीत यासाठी आमची शाळा प्रयत्नशील आहे.यासाठी विविध उपक्रमाचे आय्जन केले जाते. मुलांच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जातो. संख्यात्मक विकासापेक्षा गुणात्मक विकासाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.
आनन्दाध्ययनम् अर्थपुर्णानुभुती ददाति ते चक्षु:|
जून महिना सुरू झाला की वेध लागतात ते रिमझिम पडणाऱ्या पावसाचे आणि शाळेकडे धावणाऱ्या चिमुकल्या पावलांचे.... विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी काढलेल्या विविध रंग भरलेल्या रांगोळ्या तसेच शाळेच्या भिंतीवरील आकर्षक फळे या सर्व गोष्टींचे निरीक्षण करत, हातात रंगबिरंगी फुगे घेऊन मोठ्या आनंदात विद्यार्थिनींनी शाळेत प्रवेश केला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे कला. मुलांमध्ये अभ्यासाबरोबरच काही कलागुण असतात. ते प्रकट करण्याची संधी वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांना मिळवून देणे हा या छंदवर्गामागील हेतू आहे. त्या त्या विषयातील तज्ञ मार्गदर्शनाकडून प्रशिक्षण हे या छंद वर्गाचे वैशिष्ट्य होते. यामुळे मुलींनी विविध कला व कौशल्य आत्मसात करून आनंद प्राप्त केला.
शाळेमध्ये दरवर्षी विविध संकल्पनावर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन साजरे होते. यामध्ये वर्गातील जास्तीत जास्त मुलींना सहभागी करून घेतले जाते. शालेय अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्यातूनच रोज एक ते दीड तास त्या सर्व मुलांचा सराव करून घेणे हे कौशल्याचे काम वर्गातील शिक्षक कसोशीने करतात. विद्यार्थी व शिक्षक यांच्या कष्टाचे चीज म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय.
प्रवासी पक्षी दिनाच्या औचित्य साधून कवयित्री संजीवनी बोकील यांच्या “त्यांना उडू द्या” या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
नवरात्रीतील पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी. या दिवशी “वंदे स्त्री शक्ती” स्वरूपा सांगता समारंभानिमित्त आपल्या शाळेत “मर्मबंधातील ठेव ही..........” या जुन्या व दुर्मिळ प्रार्थना व कविता यांच्या संगीतमय सुरेख कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. जुन्या दुर्मिळ आठवणींचा ठेवा असलेल्या कविता व प्रार्थना याचे सुरेल आवाजात सादरीकरण विद्यार्थिनींनी केले.
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक तसेच मानसिक सबलीकरणासाठी दरवर्षी शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात येतो.. “खेल खिलाडी खेल” या उक्तीप्रमाणे विद्यार्थी वर्गाबरोबर मैदानावर पण घडत असतो. त्यातूनच विद्यार्थ्यामध्ये एकोपा ,संघटन, निर्णयक्षमता,व खिलाडूवृत्ती यांसारखे गुण वृद्धिंगत होतात.
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. . All rights reserved
Powered by Sangraha