मर्मबंधातील ठेव ही:- नवरात्रीतील पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी. या दिवशी “वंदे स्त्री शक्ती” स्वरूपा सांगता समारंभानिमित्त आपल्या शाळेत “मर्मबंधातील ठेव ही..........” या जुन्या व दुर्मिळ प्रार्थना व कविता यांच्या संगीतमय सुरेख कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. जुन्या दुर्मिळ आठवणींचा ठेवा असलेल्या कविता व प्रार्थना याचे सुरेल आवाजात सादरीकरण विद्यार्थिनींनी केले.
“ जून ते सोनं” या उक्तीप्रमाणे अनेक जुन्या प्रार्थना व कविता विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात सादर केल्या स्पष्ट उच्चार, ओघवती भाषाशैली, व योग्य हावभावांसह या कार्यक्रमाचे निवेदन विद्यार्थिनींनी उत्कृष्टपणे सादर केले. हा संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ प्राजक्ता ताई वैद्य यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला.